Breaking
March 3, 2026

Operation Sindoor live : ऑपरेशन सिंदूर घडवून पहलगाम हल्ल्याचा भारताने असा घेतला पाकिस्तानचा बदला..

आतंकवाद्यांना नेहमीच पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तान पाकिस्तानी सेना आणि ISI पुरस्कृत आतंकवाद्यांनी पहालगम मध्ये धार्मिक कट्टरतावादातून मुस्लिम व्यतिरिक्त हिंदू आणि इतर धर्मीय पर्यटकांवरती ज्या प्रकारे भ्याड हल्ला केला आणि 26 निष्पाप नागरिक व पर्यटकांची हत्या केली. त्या पहलगाम हल्याचा बदल घेण्याची सुरवात भारताने  ऑपरेशन सिंदूर लाँच करून चालू केली. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यामुळे भारत पाक IND VS PAK संबंध शिगेला पोहचले असून भू राजकीय परिथिती ताणली गेली आहे.

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा 2019 नंतर खोऱ्यात झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.
पहलगाम 2025 हल्ल्याचा बदला भारताने सिंदूर ऑपरेशन करून घेतला. सात मे च्या मध्यरात्री एक वाजून 44 मिनिटांनी प्रसारित झालेल्या रक्षा मंत्रालयाच्या प्रकटनानुसार भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त कश्मीर मधील दहशतवादी स्थळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले होते.

हे ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे ? ते जाणून घ्या.

PIC COURTESY : GOOGLE IMAGES
Local residents and members of the media examine a building damaged by a suspected Indian missile attack near Muzaffarabad, the capital of Pakistan controlled Kashmir, in Wednesday, May 7, 2025. (AP Photo/M.D. Mughal)

ऑपरेशन सिंदूर ( operation sindoor ) मध्ये भारतीय सशस्त्र दलाने बुधवार पहाटे पाकिस्तान आणि एलओसी नजीक च्या सुमारे नऊ ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा आणि टी आर एफ अशा दहशतवादी संघटनांच्या स्थळांना समावेश होता. त्यामध्ये  बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरनाल कॅम्प, सरजाल कॅम्प, मेहमूना कॅम्प POK आणि पाकिस्तानातील हे नऊ दहशतवादी तळ उडवण्यात आले आहेत. ऑपेरेशन सिंदूर मुळे पाकिस्थान मध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून पाकिस्तान चा भाग असलेल्या व स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने केला खालील तंत्रज्ञानाचा वापर..

ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे संमिश्र ऑपरेशन होते यामध्ये भारताने नुकत्याच फ्रान्स कडून विकत घेतलेल्या डसॉल्ट राफेल फायटर जेट (Dassault Rafale fighter jet) आणि सुखोई सु थर्टी एम के आय sukhoi Su-30MKI या विमानांचा व आयएआय हॉरोन  (IAI HERON UAV) या मानव रहित ड्रोन चा समावेश होता. अत्याधुनिक SCALP EG  क्रूज मिसाईल AASM HAMMER हॅमर स्मार्ट बॉम्ब यांचा मारा विविध दहशतवादी स्थळांवरती करण्यात आला. नेत्रा AEW&C एअरबोर्न अर्ली वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टम वापार केला. हि सिस्टिम  रिअल-टाइम कमांड अँड कंट्रोल, शत्रूच्या विमानांचा मागोवा घेणे आणि युद्धभूमीची जागरूकता  प्रदान प्रदान करते .

भारतीय लष्कराने टारगेट स्थळांची निवड करताना लक्षणीय संयम दाखवला, भारतीय सशस्त्र दलांची ही कृती केंद्रित नियोजित अत्यंत मोजमापित होती. यामध्ये पाकिस्तानी लष्करी सुविधा किंवा पाकिस्तानी नागरिकांना व आर्थिक केंद्रे यांना  कोणत्याही प्रकारे लक्ष केलेले नव्हते.  या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान ने नेहमीप्रमाणे सीमावर्ती भागात मोर्टार बॉम्बिंग व गोळीबार केली. पाकिस्तानी सैन्याने पूंछ, राजौरी जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवर (LoC) असलेल्या कृष्णा घाटी, शहापूर, मानकोट, लम, मंजाकोट आणि गमबीर ब्राह्मणा गावांवर जोरदार तोफगोळ्यांचा मारा केलाय. सध्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *