चॅम्पियन, धडाकेबाज फलंदाज आणि भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Former Indian Test Team Captain Rohit Sharma ) याने सोशल मीडियावर पोस्ट करून कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. आयपीएल 2025 अखेरच्या टप्प्यात असताना तसेच इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिके आधीच स्टार फलंदाज आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा याने (Rohit Sharma Retire )अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
बुधवारी संध्याकाळी रोहितने Instagram वर आपल्या कसोटी संघाच्या कॅपचा फोटो असलेली पोस्ट शेअर करत अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार, मला फक्त एक गोष्ट जाहीर करायची आहे की, मी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या जर्सी मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सर्वात सन्मानाची बाब ठरली आहे.”

टीम इंडियाला मिळणार नवीन टेस्ट कॅप्टन !
New test captain for team India : रोहित ने मागच्या वर्षी t20 टी 20 विश्वचषक जिंकताच टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार. रोहितच्या कसोटी क्रिकेट निवृत्ती मुळे इंग्लंड दौऱ्यापासून ( IND vs ENG ) भारताला नवीन कसोटी कर्णधार मिळणार. नियमित कसोटी खेळणारे काही खेळाडू जसे की जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांचा भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराच्या शर्यतीत समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी ( India tour of England ) जेव्हा भारतीय कसोटी संघ निवडला जाईल तेव्हा याच बैठकीत भारताच्या नव्या कसोटी कर्णधाराची निवड होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा कसोटी पदार्पण…

रोहित शर्माचे कसोटी पदार्पण (Rohit Sharma Test Debut ) हे २०१० मध्येच दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या नागपूर कसोटीत होणार होते, अगदी टॉस पर्यंत सर्व सुरळीत होते, टॉस च्या काही वेळ आधी रोहित बाबत एक विलक्षण घटना घडली. मॅचच्या आधी प्रॅक्टिस करतांना इशांत शर्माच्या बुटलेस क्रॅशर वर क्षेत्ररक्षण करतांना रोहितचा डावा पाय मुरगडाला आणि त्याला गंभीर स्वरूपाची अँकल इंज्युरी झाली. त्यामुळे रोहितचे कसोटी पदार्पण तीन वर्ष लांबणीवर गेले. तब्बल तीन वर्ष कसोटी पदार्पणाची वाट बघितल्यानंतर २०१३ मध्ये वेस्ट इंडिज west Indies विरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण झाले. विशेष म्हणजे हि कसोटी मालिका क्रिकेटचे देवता मानलेल्या सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) साठी निवृत्ती निमित्य निरोप समारंभीय कसोटी मालिका होती. .
रोहित शर्मा टेस्ट रेकॉर्डस् ( Rohit Sharma Test Records)
रोहितने 62 कसोटी सामने खेळले आणि 44.49 च्या सरासरीने 4,194 धावा केल्या. त्यात 12 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे. एकदिवसीय पदार्पणाच्या तुलनेत त्याने आपली कसोटी कारकीर्द उशिरा सुरू केली असली तरी रोहितने विशेषतः सलामीवीर म्हणून कसोटीत मोठा प्रभाव टाकला. घरच्या मैदानावर त्याचा फॉर्म विशेष प्रभावी राहिला आणि त्याने वेगवान गोलंदाजीसह फिरकीलाही सहजपणे तोंड दिले.
रोहित शर्मा व एम एस धोनी यांचा रिटायरमेंट संयोग
महेंद्र सिंग धोनीने (M. S. Dhoni )पाच वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०२० ला आंतर राष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. एम एस धोनी ने सोसिअल मीडिया अकाउंट आपल्या आंतर राष्ट्रीय करिअर मधील एक व्हिडीओ सोसिअल मिडीआयवर सुमारे ७ वाजून २९ मिनिटांनी शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. त्याच प्रकारे जेमतेम त्याच वेळी काही सेकंड मागे पुढे रोहित शर्माने (Rohit Sharma )आपल्या टेस्ट कॅप असलेली स्टोरी इंस्टाग्राम वर पोस्ट करत कसोटी क्रीकरत मधून निवृत्ती जाहीर केली, हा एक संयोग
आणखी एक योगायोग असा की रोहित शर्मा आणि एमएस धोनी दोघांनीही त्यांचा शेवटचा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला. रोहितची शेवटची कसोटी २०२४ मध्ये बॉक्सिंग डे कसोटी होती कारण त्याने सिडनी कसोटीपूर्वी स्वतःला संघातून वगळले होते, तर धोनीची शेवटची कसोटी अगदी १० वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी होती.

