पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले ceasefire violation by pakistan.
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास उच्चस्तरीय डीजीएमओ भारत आणि डीजीएमओ पाकिस्तान यांच्या बैठकीत शस्त्रसंधी ceasefire करण्यात आली होती. याबाबत संरक्षण मंत्रालयाने औपचारिक प्रकटन सुद्धा केले होते. या शस्त्रसंधीच्या काही तासातच पाकिस्तानने भारतामधील श्रीनगर राजस्थान मधील बाडमेर आणि पंजाब मधील विविध ठिकाणी हल्ले करण्यास सुरुवात केली (Pakistan attack shringar and badmer). स्थानीय नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने आणि लाईव्ह प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी अनेक ठिकाणी विस्फोट अनुभवला. तसेच राजस्थान येथील बाडमेर या ठिकाणी अनेक ड्रोन उडत असल्याचे निदर्शनात आले.
भारताच्या विदेश मंत्रालयाचे सचिव श्री मिस्री आणि स्पष्ट करतांना सांगितले की, पाकिस्तानचे pakistan DGMO यांनी भारताच्या DGMO यांना दुपारी 3.35 वाजता फोन वरती चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी ऑपरेशन्स महासंचालक DGMO उच्चस्तरीय चर्चे दरम्यान दोन्ही पक्षांनी नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी शस्त्रसंधीचे पालन करण्याचे मान्य केले होते. या चर्चे दरम्यान दोन्ही पक्षांनी आज शनिवार सायंकाळी 5 वाजे पासून जमीन हवाई तसेच समुद्रामध्ये सर्व प्रकारचे सैन्य कार्यवाही थांबवण्याचे मान्य केले होते.
मात्र काही तासातच या शस्त्रसंधीच्या चर्चे वर पाणी फिरले गेले. पाकिस्तान ने रात्री 9 वाजताच्या सुमारास भारतावर हल्ले करण्यास सुवात केली. सर्व प्रथम जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये अनेक विस्फोट सुरू झाले. याबाबत स्थानिक लोकांनी पुष्टी केली. श्रीनगर मध्ये होणाऱ्या हल्ल्याबाबत खुद्द जम्मू आणि काश्मीर चे मुख्यमंत्री श्री अब्दुल्ला omar abdullah यांनी तत्काळ x या सोशियल मिडिया वर पोस्ट करत माहिती दिली. यानंतर श्री ओमर अब्दुल्ला यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओ मध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सुरू झाली असून पाकिस्तान केलेला हल्ला भारतीय संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.
Omar abdullah यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://x.com/OmarAbdullah/status/1921228736776527917?t=qgLqMicYCrEG2TwDeXITRw&s=19
श्रीनगर आणि राजस्थान येथील स्थिती..
Drone attack by pakistan after ceasefire violation on shrinagar and badmer
Shrinagar श्रीनगर येथील लाल चौक lal chowk येथे अनेक ड्रोन स्पॉट करण्यात आले. श्रीनगर येते विस्फोट आणि ड्रोन हालचाली सुरू असतांनाच राजस्थान येथील बाडमेर येथे सुद्धा ड्रोन हालचाली बघावयास मिळाल्या.
भारतीय रडार यंत्रणेने indian air defence system अनेक ठिकाणी ड्रोन संचालन ओळखल्या नंतर स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला. राजस्थान मधील बाडमेर, जैसलमेर पंजाब मधील अमृतसर पठाणकोट फिरोजपुर, तरण तारण या सीमावर्ती भागात ब्लॅकआउट blackout in करण्यात आला व सतर्कतेचा सायरन स्थानिक प्रशासनाने चालू केला. स्थानिक पोलिसांनी स्थितीचे गांभीर्य ओळखून धोक्याची घंटा वाजवत अनेक बाजारी ठिकाणे पथ दिवे बंद करून ब्लॅकआउट करण्यात आले.
गुजरात मधील स्थिती..
Black out in border area of Gujarat kutch
यानंतर सुमारे 10 वाजताच्या सुमारास गुजरात मधील कच्छ येथे सुमारे सात पाकिस्तानी ड्रोन पडल्याची माहिती समोर आली. तसेच गुजरातमधील सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुजरातचे गृह राज्य मंत्री gujarat home minister of state श्री हरीश संघवी यांनी गुजरातच्या कच्छ Kutch भागात ड्रॉन दिसल्यानंतर कच्छ भागात पूर्णपणे ब्लॅकआउट केल्याचे स्पष्ट केले.
आज दिनांक १० मे २०२५ च्या रात्री ११ वाजेपर्यंत जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी गोळीबारी आणि मोरटार बॉम्बिंग तसेच ड्रोन हल्ल्याचे माहिती समोर येत होती. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान कडून सुमारे १०० हून अधिक हल्ले एकट्या श्रीनगर मध्ये करण्यात आले. अधिक माहिती संकलित करणे सुरू असून, पुढील घडामोडींसाठी spardhatmak.com ला भेट देत रहा.

