Breaking
March 3, 2026

आयपीएस बिरुदेव डोने यांनी सांगितले व्हायरल झालेल्या  बकऱ्या चारणाऱ्या व्हिडिओ मागील सत्य !

UPSC 2024 551 rank IPS Birdev Done viral video fact

IPS Birdev Done picture courtesy : google image

आपल्या जिद्द चिकाटी आणि परिश्रमाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून 551 रँक मिळवलेल्या आणि आयपीएस या पदाला गवसणी घातलेल्या बिरदेव डोने यांनी निकालाच्या दिवशी माळावरती बकऱ्या चारणाऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य एका सोशल मीडिया अकाउंटला दिलेल्या मुलाखतीत उजागर केले.

आयपीएस बिरदेव डोने यांच्या मते त्यांनी यूपीएससी (UPSC) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारी दरम्यान 2021 पासून ते आज पर्यंत कधीही बकऱ्या व मेंढर चारण्यासाठी गेलेले नाही.  त्यांनी पूर्णवेळ यूपीएससीची तयारी केली.

UPSC 2024 AIR 551 IPS BIRDEV DONE viral video of grazing goat and sheeps. Pic courtesy social media account x.

या दरम्यान त्यांनी पुणे व दिल्ली येथे पूर्णवेळ यूपीएससीची तयारी केली निकालाच्या एक-दोन दिवस आधी ते माळावरती गेले होते व पिढी जात शैली असल्यामुळे ते बकऱ्या व मेंढर चरताना त्यामागे होते. काही काळापासून त्यांच्या वडिलांची प्रकृतीही चांगली नव्हती. त्यांचे डायलिसिस करण्याचा विचार केला जात होता. आयपीएस बिरदेव डोने यांच्या वडिलांना बकरीचे दूध आवडायचे व थोडा प्रासंगिक बदल म्हणून ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बेळगाव रोडवरील बाळ्या वरती गेले होते.

आयपीएस बिरदेव डोने यांच्या मते निकाल जरी लागायचा होता तरीही ते आपली जीवनशैली निकालाची चिंता करून व्यर्थ घालवू इच्छित नव्हते.

IPS Birdev Done: यांच्या मते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांच्या प्रकृती विषयी विचार विनिमय चालू होता आणि त्यांच्या वडिलांना बकऱ्याचे दूध आवडायचे घरी बसून त्यांना जेवण वगैरे जात नव्हते त्यामुळे एक प्रासंगिक बदल म्हणून निकालाच्या चार-पाच दिवस आधी ते माळावरती गेले होते.

आयपीएस बिरदेव डोने यांनी मुलाखतीत पुढे बोलताना सांगितले की, त्यांनी सांगितलेला चांगल्या गोष्टी वगळून टीआरपी साठी त्यांचा व्हायरल झालेली माळावरची व्हिडिओ मीडियाने सर्वत्र चालवला. त्यांच्या मते मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांनी थोडं जबाबदार व्हायला हवं.

या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या आणि रंग रूपाने साधा वाटणाऱ्या बिरदेव डोने याचे महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना खूप शुभेच्छा मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *