Breaking
March 3, 2026

Maharashtra state board hsc result 2025 : आज जाहीर होणार वर्ग 12 वीचा निकाल, इथे पाहता येणार महाराष्ट्र स्टेट बोर्ड hsc 2025 चा निकाल…

Maharashtra state board hsc result check online

आज दिनांक 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच HSC बारावीचा निकाल दुपारी १.००  वाजता राज्य मंडळांनी अधिकृत केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी आज दुपारी १.००  वाजता पासून आपला निकाल खालील दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन बघू शकतील.

Maharashtra state board hsc result 2025 बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा


mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org/

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल. वरील संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात तसेच गुणपत्रिकेची प्रत काढण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच स्टेट बोर्ड राज्य मंडळाच्या प्रकटनानुसार मंगळवार दिनांक 6 मे 2025 पासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रकाचे वितरण सुरू होईल.

निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती .

Official announcement of class 12 Maharashtra state board hsc result 2025


इयत्ता दहावीचा निकाल लवकरच..


वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता असून किमान एक आठवडा वाट बघावी लागणार आहे.
सन 2025 मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने विभागांमार्फत संपूर्ण राज्यात इयत्ता बारावी व दहावीचे परीक्षेचे नियोजन केले होते. याच दरम्यान इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 15 मे च्या आधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *